-0.4 C
New York
Thursday, March 19, 2026

Buy now

आ. नितेश राणेंच्या विरुद्ध लढण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर

संदेश पारकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देण्यात आला एबी फॉर्म

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघासाठी सर्वत्र युवा नेते, माजी नगराध्यक्ष व सध्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सिंधुदुर्गचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून एबी फॉर्म देण्यात आला आहे.

मुंबई येथे मातोश्रीवर संदेश पारकर यांना बोलावण्यात आले होते. यावेळी सर्वत्र संदेश पारकर यांना उमेदवारी जाहीर होणार हे निश्चितच असल्याची चर्चा मात्र आता सत्यात उतरलेली पहायला मिळत आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते संदेश पारकर यांना एबी फॉर्म देण्यात आला. यावेळी माजी खासदार तथा उबाठा शिवसेनेचे सचिव विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!