11.9 C
New York
Sunday, November 3, 2024

Buy now

वैभव नाईक यांच्या प्रचाराचा मालवणात शुभारंभ

मालवण : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्याबरोबरच कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक यांच्या विजयाची हॅट्रिक व्हावी त्याचबरोबर ते जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत असे गाऱ्हाणे आज शहराचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चरणी उबाठा शिवसेनेच्या वतीने घालण्यात आले. शहरातील आणि देऊळवाडा येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचे दर्शन घेत कुडाळ- मालवण विधानसभेचे उबाठा शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार ओरसकर, मंदार केणी, बाबी जोगी, नितीन वाळके, नंदू गवंडी, उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, सेजल परब, पूनम चव्हाण, नीनाक्षी शिंदे, दीपा शिंदे, शिल्पा खोत, यतीन खोत, निना मुंबरकर, गणेश कुडाळकर, किशोर गावकर, पियुष चव्हाण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, मेघनाद धुरी, संदेश कोयंडे गौरव वेर्लेकर, भगवान लुडबे, अन्वय प्रभू, रश्मीर रोगे, माधुरी प्रभू, सुर्वी लोणे, रविकिरण आपटे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री देव रामेश्वर बरोबरच श्री देव नारायण श्रीदेवी सातेरी मंदिरात जाऊनही वैभव नाईक यांनी दर्शन घेतले. आमदारकीच्या गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे मतदार संघातील जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असून या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे असा विश्वास श्री. नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!