3.2 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

२४ ऑक्टोबर रोजी आमदार वैभव नाईक उमेदवारी अर्ज दाखल करणार

जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन

मालवण : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीकडून आमदार वैभव नाईक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवार दि. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी आमदार वैभव नाईक आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रथमतः सकाळी १० वाजता कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणावर त्यांची सभा होणार आहे. त्यानंतर सभा स्थळ ते कुडाळ बाजारपेठेतील एसटी स्टॅंड कडून पोलीस स्टेशन मार्गे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयाकडे जात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणेकर यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!