15.3 C
New York
Saturday, March 22, 2025

Buy now

विधानसभा मतदारसंघात आमदार नितेश राणेंची हवा

प्रतिस्पर्धी उमेदवारच जाहीर होत नसल्याने ; आणखीणच सोशल मीडियावर प्रचाराचा सपाटा

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली – देवगड – वैभववाडी मतदारसंघामध्ये भाजप – महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार नितेश नारायण राणे यांचे नाव अधिकृतरित्या जाहीर होणे बाकी असतानाच आमदार नितेश राणे यांच्याकडून मात्र सोशल मीडियावरील प्रचारात आघाडी घेण्यात आली आहे. सध्या आमदार नितेश राणे यांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावर अक्षरशः रील्स व पोस्टरांचा पाऊस पडत असून केलेली विकास कामे, जनतेचे सोडवलेले प्रश्न व जनतेशी असलेले आ. नितेश राणे यांचे नाते या साऱ्यांच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त वेगवान जनतेपर्यंत आपली केलेली विकास कामे पोहोचविण्याचा केलेला प्रयत्न केला. आमदार नितेश राणे हे निवडणुकीच्या ऑफलाईन प्रचारा सोबतच सोशल मीडियावरील प्रचारात अग्रक्रमांकावर असल्याने त्यांना अद्यापही प्रतिस्पर्धी उमेदवार देखील मिळत नाही आहे. मात्र समोर आता कोणताही उमेदवार असू दे मताधिक्य वाढवून विरोधकांना भुईसपाट करण्याच्या खास राणे स्टाईलचे तंत्र सध्या अवलंबले जात आहे.

आमदार नितेश राणेंच्या विरोधात कोण असेल हा भाग वेगळा असला तरी आ. नितेश राणेंच्या या सर्व सोशल मीडियाच्या प्रचाराला तोडीस तोड उत्तर अद्याप विरोधकांकडून दिले जात नाही, यातच खरी राणेंची असलेली ताकद दिसून येते. त्यामुळे सध्या तरी मतदारसंघात आमदार नितेश राणें यांचीच हवा असल्याचे पाहायला मिळत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!