17.5 C
New York
Monday, September 1, 2025

Buy now

कणकवलीत साहित्यिक दिवाळी 

कौशल इनामदार, अशोक बागवे यांची २७ रोजी बहारदार मैफल

स्थळ : माती नेचर रिसॉर्ट, जानवली 

वेळ : सायंकाळी ६ वाजता

कणकवली : स्वामीराज प्रकाशन या संस्थेमार्फत रविवार २७ ऑक्टोबर रोजी कणकवली नजीक जानवली येथील माती नेचर रिसॉर्ट येथे सायंकाळी ६ वाजता ‘ साहित्यिक दिवाळी ‘ आयोजित करण्यात आली आहे.

प्रसिद्ध कवी अशोक बागवे आणि संगीतकार कौशल इनामदार यांची ‘ माझ्या मातीचे गायन ‘ ही मैफल यावेळी सादर होणार असून सुधीर चित्ते आणि अस्मिता पांडे त्यांच्याशी संवाद साधतील.

स्वामीराज प्रकाशनच्या ‘ मराठी आठव दिवस ‘ या मासिक उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला असून यावेळी ‘ रंगबावरी ‘ दिवाळी अंकासह लक्तरांचा लिलाव (अशोक बागवे) आणि पत्रावळ (तपस्या नेवे, अमेय रानडे) या दोन पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे.

या साहित्यिक दिवाळीत सर्वांना मुक्त प्रवेश असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामीराज प्रकाशनचे रजनीश राणे आणि माती नेचर रिसॉर्टचे प्रफुल्ल सावंत यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!