14.5 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष भक्कम ; आ. नितेश राणे

राजन तेली यांच्यासारखे अनेकजण पक्ष प्रवेश करणारे आहेत ; त्याचा काही मोठा परिणाम नाही

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली येथील आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांना राजन तेलिंच्या पक्षप्रवेशा बाबत प्रश्न विचारल्यावर आ. नितेश राणे म्हणाले, दर पाच वर्षानंतर असे प्रवेश कोणीतरी करतात. पहिले परशुराम उपरकर होते, सतिश सावंत होते आता हे राजन तेली आहेत.

सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग मध्ये एक उमेदवार नाही. जो आमच्या महायुतीच्या उमेदवाराला हरवू शकेल. एक कडवट शिवसैनिक नाही जो महायुतीच्या उमेदवारासोबत लढू शकतो. हे खरंतर आश्चर्याची गोष्ट आहे.

उद्धव ठाकरे ने त्यांचे कितीही पाळीव प्राणी आमच्याकडे सोडले तरी त्याचा आमच्यावर फरक पडणार नाही त्याची आम्हाला सवय झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष हा भक्कम आहे. भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे यांनी फ्लावर समजलं काय आम्ही फायर आहोत हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं असा इशारा देखील आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला.

काल शरद पवार यांनी ईश्वरपूर मध्ये राहून उद्धव ठाकरेंच्या सणसणीत कानाखाली मारली आहे ? किती दिवस रात्र मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पहायचे. आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांना मीच मुख्यमंत्री बनणार असे बसंगत सुटलेले आहेत. शरद पवार, नाना पटोले, रोज कपडे फाडण्याचे काम करत आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंनी लायकी काय आहे हे आम्ही बोलण्यापेक्षा महाविकास आघाडीचे मित्रपक्ष दाखवत आहेत. त्याचप्रमाणे जागा वाटप बाबत वरिष्ठ पातळीवर आणि पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल त्या पद्धतीने उमेदवार जाहीर होतील. ज्या उमेदवारांच नाव यादीत येईल ते सगळे त्या त्या पद्धतीने कामाला लागतील.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!