सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या गावांमध्ये वाघांचं अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालेल आहे. आंबोली ते दोडामार्ग या दोन गावांमध्ये वाघांचे दर्शन झाले असून या बाबतचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे प्राणी मित्रांनी समाधान देखील व्यक्त केल आहे. काही वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत होती. त्यानंतर वाघांची संख्या हळूहळू घटून शून्यावर आली. यामुळे वन्यप्रेमींमधून नाराजी स्पष्ट दिसू लागली. पुन्हा आता वाघांच दर्शन झाल्याने शेतकरी व प्राणी मित्रांकडून समाधान व्यक्त होत आहे. याबाबतची माहिती उपवनसंरक्षक नंदकिशोर रेड्डी यांनी दिली.