कोल्हापूर : वनिता सांस्कृतिक संस्थेतर्फे शनिवारी (दि. १९) ‘काही क्षण.. थोडे धन.. आत्मचिंतन मातृभूमीसाठी’ कार्यक्रम आयोजित केला आहे. आर. के. नगर सोसायटी क्रमांक पाचमधील सभागृहात सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाची सुरुवात होईल. कार्यक्रमात सुमेधाताई चिथडे यांच्याशी संवाद साधला जाईल. सियाचीन, काश्मीर येथे सैनिक, आणि पर्यटकांसाठी ‘ऑक्सिजन, रिफिलिंग प्रकल्पा ‘ची उभारणी चिथडे यांनी केली आहे. स्वतःचे दागिने विकून, समाजाच्या मदतीतून सुमारे सहा कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत. वीरमरण आलेल्या सैनिकांच्या सहचारिणींसाठी, युद्धात जखमी झालेल्या सैनिकांसाठी कार्यरत आहेत.