कणकवली ( मयुर ठाकूर ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. मागील ड9न दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. यामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यासारख या पावसामुळे झाले आहे. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत पडला आहे. शासन प्रशासनाने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतीचे नुकसान तरी भरपाई करून द्यावि अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.