8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

फोंडाघाट चेक नाक्यावर पकडली १४ लाख ४५ हजार ४०० रुपयांची रोकड

पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे व पोलीस कॉन्स्टेबल उद्देश कदम यांनी केली कारवाई

कणकवली : येथील फोंडाघाट चेक नाक्यावर वाहनांच्या तपासणी दरम्यान कोल्हापूरच्या दिशेने जाणारी पांढऱ्या रंगांची माई हुंदाई कार ( एम एच ०९ जीए ९४३९ ) चालक – जयसिंग मल्हारी पाटीलही हे घेऊन जात असताना फोंडाघाट येथील चेक नाक्यावर कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे व पोलीस कॉन्स्टेबल उद्देश कदम यांनी तपासणीकरिता थांबवली. यावेळी सदर कारमध्ये सुमारे १४लाख ४५ हजार ४०० रुपयाची रोकड आढळून आली. ही कारवाई बुधवारी दुपारी १२ वा. च्या. सुमारास करण्यात आली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरची रोकड घेऊन कारमधील इसम जयसिंग मल्हारी पाटील हे कोल्हापूर येथे जात होते. तसेच ती रोकड एका सळी व्यापाऱ्याची असल्याचे समोर आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे व उद्देश कदम यांनी यापूर्वी देखील अशी कारवाई केली आहे. सध्या आचारसंहिता सुरू असल्याने ही कारवाई करण्यात आली, असल्याची माहिती मिळाली. मात्र आचारसंहिता काळात अशा प्रकारची रोकड पकडली गेल्याने पोलिसांची करडी नजर असल्याचे दिसून येते. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत कोणतीही नोंद नव्हती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!