8.4 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

कोकणातील पहिल्या मार्केट यार्डचे स्वप्न आता उतरणार सत्यात

कणकवली : तालुक्यातील नांदगाव येथे कोकणातील पहिल्या मार्केट यार्डचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. केंद्रीय माजी मंत्री खासदार नारायण राणे, सिंधूरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेवरून आणि आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या मार्केट यार्ड साठी ४ कोटी २४ लाख ६६ हजार रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सिंधूरत्नचे सदस्य प्रमोद जठार यांनी फार मोठी मेहनत घेतली. मार्केट यार्डसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ५ इमारती, परिसराला संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते आणि भव्य असे प्रवेशद्वार उभारण्यासाठी हा निधी मंजूर झालेला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी या सिंधू रत्न समृद्ध योजनेतून ४ कोटी २४ लाख ६६ हजार रुपयाची मंजुर झालेले पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांना दिले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोकणातील पहिले सुसज्ज मार्केट यार्ड उभे राहणार आहे. त्यामुळे या भागातील आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, भात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचा कोकणी मेवा, ताजे मासे, सुकी मासळी, अशा उत्पादनां बरोबरच वेगवेगळे लाकूड, खैर लाकुड व जंगली लाकूड यांची ने आन करण्यासाठी सोयीचे होणार आहे. त्याचप्रमाणे कोकणात येणाऱ्या पालेभाज्या किंवा जीवनावश्यक वस्तू यांची या ठिकाणी स्टोरेज करून ते जिल्हाभर डिस्ट्रीब्यूट करण्याचा सर्वाधिक महत्वाचा असा हा उपक्रम यशस्वीरित्या होत आहे. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून नांदगाव रेल्वे स्टेशन नजीक कृषी उत्पन्न बाजार समितीने जमीन खरेदी केल्यानंतर त्या ठिकाणी इमारती उभ्या राहणे गरजेचे होते आणि ते काम या निमित्ताने पूर्णत्वास जाणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!