8.4 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

महिलांवर लाठीचार्ज करणाऱ्या प्रवृत्तीला आता हद्दपार करा ; परशुराम उपरकर

वेंगुर्ला : वेळागर येथील प्रकल्प लोकांना हवा असेल तर होईल, असे म्हणणारे शिक्षण मंत्री दीपक केसरकर महिलांवर लाठीचार्ज करून डोके फोडायला लावतात. अशा प्रवृत्तीला आता हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले. दरम्यान कमिशन घेऊन आपली तुमडी भरण्यासाठी लोकांच्या मागण्यांबाबत विचार न करता प्रकल्प लादला जात असेल तर ते सहन केले जाणार नाही, आम्ही भूमिपुत्रांच्या बाजूने ठाम राहू, असेही त्यांनी सांगितले आहे.

याबाबत श्री. उपरकर यांनी प्रसिद्ध पत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, वेळागरवासीयांनी एकजूट दाखवत हुकूमशाहीला विरोध केला त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदनच करतो. मात्र एकीकडे महिलांचा सन्मान करण्याचा दिखाऊपणा करणारे राज्य सरकार व लोकांना हवा असेल तर प्रकल्प होईल असे म्हणणारे शिक्षण मंत्री दीपक केसरकर महिलांवर लाठीचार्ज करून डोके फोडायला लावतात. सिंधुदुर्ग वासियानी अशा प्रवृत्तीला हद्दपार करण्याची हीच वेळ आहे.

वेळागरवासी यांच्या या विषयाला ३० वर्षे झाली. मात्र कमिशन घेऊन आपली राजकीय तुमडी भरण्यासाठी लोकांच्या मागण्यांबाबत विचार न करता प्रकल्प लादला जात असेल तर ते चुकीचेच आहे. ३० वर्ष सुरू असलेल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठीच्या लढ्याला अशा प्रकारे पोलीस बळाचा वापर करून चिरडून टाकण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे. एकीकडे महिला सन्मानाच्या नावाने गळा काढणारे राज्य सरकार याच महिलांवर लाठी चार्ज करतात त्यांची डोके फोडण्यापर्यंत यांची मजल जात असेल तर अशांना योग्य वेळी धडा शिकवण्याची गरज आहे. स्थानिक भूमिपुत्रांचा या प्रकल्पाला विरोध नाही तसा आमचाही विरोध नाही. मात्र तेथील लोकांच्या मागणीनुसार निर्णय होणे अपेक्षित असतानाही पोलीस बळाचा करण्यात आलेला वापर अत्यंत चुकीचा आहे. जोर जबरदस्ती करून प्रकल्प लादला जात असेल तर ते सहन केले जाणार नाही. आम्ही भूमिपुत्रांच्या बाजूने ठाम राहू असेही श्री उपरकर यांनी म्हटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!