मा.खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून झाला होता निधीमंजूर
विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर झाले भूमिपूजन
देवगड – मा. खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून खुडी गावातील श्री देव हेदुबाई मंदिराच्या सुशोभीकरणासाठी रोख रक्कम 15 लाखाचा निधी मा. खासदार विनायक राऊत यांनी मंजूर करून दिला. या मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामाचा आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न झाले. यासाठी सतीश सावंत, सुशांत नाईक यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. खुडी गावच्या ग्रामस्थांनी मा. खासदार विनायक राऊत यांचे मनापासून आभार व्यक्त केले. यावेळी गावातील शिवाजी चौक ते पोयरे खुडीपाट रस्ता या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या व खुडीपाट मुख्य रस्त्यापासून खडीकरण डांबरीकरण रस्ता गावातील या दोन रस्त्यांचे देखील श्रीफळ फोडून भूमिपूजम करण्यात आले.
यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, खुडी सरपंच दीपक कदम, उपसरपंच शशिकांत कावले, शाखाप्रमुख भाई घाडी, दीपक मुणगेकर, बाबल्या जोईल, अशोक शिद्रुक, विश्वनाथ घाडी, उमेश मराठे, बाळा जोईल, महादेव घाडी, रमेश घाडी, संदीप घाडी, अशोक गुळेकर, अमिता कावले, रवी मनचेकर, प्रवीण तांबे आदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.