मसुरे प्रतिनिधी : कविता म्हणजे काय, कविता कशा कराव्यात, कवितांचे वाचन कोणत्या पद्धतीने करावे,मुलांच्या मनात कवितेविषयी आवड, कवितेचे रसग्रह, कवितेचे काव्यसौंदर्य रुजावे यासाठी कोकणच्या बहिणाबाई कवियत्री सुनंदा कुमार कांबळे यांचे मार्गदर्शन आरपी बागवे हायस्कूल मसुरे येथे संपन्न झाले. वेळी आर पी बागवे हायस्कूल मसुरे, भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल, केंद्र शाळा मसुरे नंबर एक, तसेच भरतगड हायस्कूल नंबर दोन च्या मिळून सुमारे पंचवीस विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कवितांचे वाचन इंग्रजी, मराठी, मालवणी मधून वाचन केले. कवियत्री सुनंदा कांबळे यांनी ही आपल्या काही स्वरचित मालवणी व मराठी कवितांनी सभागृहाला काव्यसागरात यथेच्छ डुंबवून काढले. त्यानंतर मुलांनी आपल्या शंका विचारल्या त्या अनुषंगाने त्यांच्या शंकांचे निरसन करत सुनंदा कांबळे मॅडमनी विद्यार्थ्यांना आणि काव्यरसिकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी आर पी बागवेहाय स्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोदे मॅडम आणि त्यांचे सहकारी तसेच भरतगड इंग्लिश मीडियम च्या सावंत मॅडम, केंद्र शाळा मसुरे चे श्री. विनोद सातार्डेकर सर, शाळा समितीचे श्री आप्पा परब दत्तप्रसाद पेडणेकर, श्री संतोष अपराज, संस्था हितचिंतक आणि पदाधिकारी श्री राजन परब, रमेश पाताडे, समीर नाईक, भानुदास परब, डी पी पेडणेकर, अनिल मेस्त्री, एस डी बांदेकर, एन एस जाधव, चरणदास फुकट ,तसेच ग्रामस्थ पालक या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भरत ठाकूर यांनी अतिशय रंगतदार केले.
या कार्यक्रमात श्री ठाकूर सर, कोदे मॅडम, सोनाली तळशीलकर, सावंत मॅडम, श्री बांदेकर सर यांनी ही आपापल्या स्वरचित कवितांचे वाचन केले. उपस्थित अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरूचित कविता यावेळी सादर केल्या. कवयित्री सुनंदा कुमार कांबळे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.