कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित संस्था राधारंग फाउंडेशनच्यावतीने अनिल अनुराधा तिरोडकर सदाप्रेम योजनेतून जिल्ह्यातील दोन गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून आर्थिक मदत करण्यात आली. अनुराधा अनिल (हरी) तिरोडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील दोन दिव्यांग मुलींना २०२४-२५ सालाची शिष्यवृत्ती देण्यात आली. त्यातीलच कणकवली तालुक्यातील हळवल येथील श्रद्धा परब हिला शिष्यवृत्तीचा धनादेश राधारंग फाउंडेशनची हितचिंतक देवी चंद्रशेखर केळूसकर हिच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शिवडाव हायस्कूलमधील मुले आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता. सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथील श्रावणी किशोर गवस हिलाही मदत करण्यात आली.
परंपरांचे संरक्षण आणि भविष्याचे संगोपन’ हे ब्रीद वाक्य घेऊनच ‘राधारंग फाउंडेशन’ ही संस्था सुरू आहे. या फाउंडेशनमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात.
या संस्थेची स्थापना रघुनाथ पांडुरंग सरनाईक यांनी केली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम राबविले जातात. त्यातीलच एक राधारंग फाउंडेशन आणि अनिल / अनुराधा तिरोडकर सदाप्रेम या योजनेतून सिंधुदुर्गातील ग्रामीण भागामधील दोन गरजू दिव्यांग मुलींना आर्थिक मदत करतो.