28.9 C
New York
Tuesday, July 1, 2025

Buy now

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मसुरे -डांगमोडेमधील ग्रामस्थ व युवकांचा शिवसेनेत प्रवेश

आ. वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन

मालवण : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील मसुरे-डांगमोडे गावामधील ग्रामस्थ व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. मसुरे गावाचा विकास आमदार वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी शिवसेना पक्षप्रवेश केला असल्याचे प्रवेश कर्त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास येथील ग्रामस्थांनी दाखवला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांना दिला आहे.

यावेळी मसुरे-डांगमोडे शाखाप्रमुख पदी विष्णू ठाकूर,उपशाखाप्रमुख पदी यशवंत ठाकूर, युवासेना शाखाप्रमुखपदी अमित चव्हाण,युवासेना उपखाप्रमुखपदी अमित ठाकूर यांची आमदार वैभव नाईक यांनी नियुक्ती पत्र देत नेमणूक केली.

यावेळी विकास ठाकूर,विलास ठाकूर,हर्षद चव्हाण,यशवंत ठाकूर,प्रल्हाद ठाकूर, कल्पना ठाकूर,वैशाली ठाकूर,गणेश ठाकूर,पुणाजी ठाकूर,उमा ठाकूर, राजेंद्र ठाकूर,विशाखा ठाकूर,प्रेमा ठाकूर,पुष्पलता ठाकूर,मनीष ठाकूर, अशोक चव्हाण,ओमकार चव्हाण, संगीता चव्हाण,महादेव चव्हाण, रोशनी चव्हाण,प्रतीक्षा चव्हाण सुभाद्रा ठाकूर,कृष्णा चव्हाण ,खेम ठाकूर या ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरोसकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, विभागप्रमुख राजेश गावकर, मसुरे सरपंच संदीप हडकर,रुपेश वर्दम,युवासेना विभागप्रमुख राहुल सावंत,गणेश नेरूरकर, अक्षय नेरूरकर,नवनाथ घाडीगावकर,हर्षद परब आदि पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!