8.2 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मसदे येथील श्री देव स्वयंभू गणेश मंदिर सभामंडपासाठी १५ लाख रु निधी मंजूर

तर पोईप येरमवाडी रस्त्यासाठी ५ लाख रुपये निधी मंजूर

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दोन्ही कामांचे झाले भूमिपूजन

मालवण : तालुक्यातील मसदे येथील श्री देव स्वयंभू गणेश मंदीर परिसरात सभामंडप उभारावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिकांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. आ.वैभव नाईक यांनी तात्काळ याची दखल घेऊन १५ लाखाचा निधी सभा मंडप उभारणीसाठी मंजूर करून दिला आहे.त्याचबरोबर पोईप येरमवाडीमधील पोईप धरण तट ते अशोक पालव यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी देखील ग्रामस्थ व शिवसैनिकांनी आ.वैभव नाईक यांच्याकडे केली होती. त्या मागणीची देखील आ. वैभव नाईक यांनी पूर्तता करत रस्त्याच्या कामासाठी ५ लाख रुपये निधी मंजूर करून दिला आहे. बुधवारी या दोन्ही कामांचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या भूमिपूजन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक यांनी स्थानिक ग्रामस्थांना हक्काचा आमदार म्हणून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. येत्या काळात मतदारसंघातील इतर अनेक रस्त्यांची व विकासात्मक कामे देखील पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानत निधी मंजुरीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला आहे. यावेळी मसदे उपशाखाप्रमुख पदी किरण गावडे यांची आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देत निवड करण्यात आली.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, मालवण युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, विभागप्रमुख विजय पालव, सुरेश नेरुरकर,रुपेश वर्दम,अनंत पाटकर, बाबली पालव, युवासेना विभागप्रमुख अक्षय नेरुरकर, गणेश नेरुरकर, शाखाप्रमुख बाळा सांडव,अनिल येरम, राजु आंगणे, राजु येरम, बबन आंगणे, मसदे गावातील दिपक मसदेकर,अवि प्रभु, किरण गावडे,अजित प्रभु,वामन देऊलकर, गणेश देऊलकर,संतोष मसदेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!