15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

मंत्री केसरकरांनी निवडणुकीच्या तोंडावर उबाठाला दिला पहिला धक्का

साटेली भेडशी उपसरपंच सुमन डिंगणेकर , भोम सरपंच अनुराधा वराडकर यांच्यासह सदस्य, कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

दोडामार्ग : विधानसभा निवडणूका जवळ येऊ लागल्या आहेत. तशा राजकिय घडामोडी सुरू झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून शिवसेना उबाठा मध्ये जोमाने काम करणारे साटेली भेडशी शिवसेना उबाठा विभाग प्रमुख गणपत डिंगणेकर तसेच साटेली भेडशी ग्रामपंचायत उपसरपंच सुमन गणपत डिंगणेकर यांनी विधानसभा निवडणूक तोडावर उबाठा सेनेला धक्का देत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथे शिवसेना पक्षात आपल्या अनेक कार्यकर्ते समवेत प्रवेश केल्याने साटेली भेडशी परिसरात राजकीय खळबळ उडाली आहे. निवडणूक तोंडावर उबाठा सेनेला धक्का दिला आहे.

साटेली भेडशी येथील गणपत डिंगणेकर हे गेल्या काही वर्षांपासून शिवसेना पक्षात काम करत होते. शिवसेना पक्षात फूट पडली तरी डिंगणेकर उबाठा सेनेत होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी काम केले होते. शिवाय साटेली भेडशी ग्रामपंचायत मध्ये पत्नी सुमन हिला उपसरपंच करण्यासाठी प्रयत्न केले होते.

या वेळी महिला जिल्हाप्रमुख सौ.निता कविटकर जिल्हाप्रमुख अशोक दळवी,प्रेमानंद देसाई,वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर,दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस,एकनाथ नारोजी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!