उपजिल्हा फुले नजीकचे फुटले व त्या स्टॉल मूळ पाणी तुंबले
गेले चार दिवस हा स्टॉल थेट रस्त्यावरच ; याला जबाबदार नक्की कोण?
कणकवली : मागील काही दिवसांपासून कणकवली सह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विजांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज मात्र पावसाने हाहाकार उडवला. या पावसामुळे अनेक ठीकाणी भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे.
एकंदरीतच जर पाहिले तर शहरातील गटारे तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलेले दिसत आहे. छाया चित्रात असलेले हे चित्र कणकवली नरडवे मार्गावरील कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोरील आहे. एका दुकानाच्या बाहेर थेट रस्त्यावरच हा स्टॉल लागलेला आहे. आणि या स्टॉलमुळे मोठ्या प्रमाणात वाहणारे पाणी अडकून वठ्या प्रमाणात तुंबले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा होतच आहे त्याचबरोबर पावसाचे पाणी देखील साचल्याने ते आजूबाजूच्या स्टॉल मध्ये शिरण्याची शक्यता आहे.
नरडवे मार्गावरील फुटपाथ आणि मार्गावर अडथळा निर्माण होईल असे लागलेले स्टॉल यावर नगरपंचायत प्रशासन कारवाई करणार की नाही हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.