1.6 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या दहा परप्रांतीय कामगारांवर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

मालवण : तालुक्यातील हडी कालावड खाडीपट्ट्यात अवैधरीत्या वाळू उपसा करण्यास आलेल्या दहा परप्रांतीय कामगारांना आज पोलिसांनी ताब्यात घेत तहसीलदारांसमोर हजर करत प्रतिबंधात्मक कारवाई केली.

तालुक्यातील हडी कालावल खाडी पट्ट्यात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने महसूल प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेत अनेक डंपरवरही कारवाई केली आहे.

यातच प्रांत ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झालटे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष नांदोसकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत पेडणेकर, पोलीस हवालदार सुशांत पवार, महादेव घागरे, गृहरक्षक दलाचे जवान मिथुन म्हापणकर यांच्या पथकाने आज हडी कालावल खाडीपट्ट्यात अवैधरित्या वाळू उपसा करण्यास आलेल्या परप्रांतीय दहा कामगारांना ताब्यात घेत तहसीलदारांसमोर हजर करत प्रतिबंधात्मक कारवाई केली. यापुढेही तालुक्यातील विविध खाडीपट्ट्यात अवैधरित्या वाळू उपसा करण्यास आलेल्या कामगारांवर कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!