अफवेमुळे नागरिकांसह पोलिसांची “रंगीततालीम”
वेंगुर्ले : वांयगणी माळरानावर एका खड्ड्यात मृतदेह पुरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गावासह पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली. सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चेनंतर सर्वांनी त्या ठिकाणी धाव घेऊन तो खड्डा खणला. परंतु त्या खड्ड्यात मेलेला बकरा पुरल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा विश्वास टाकला. या सर्व घडामोडीत ग्रामस्थांसह पोलिसांची मात्र रंगीत तालीम झाली. मात्र या घटनेची चर्चा गावासह तालुक्यात जोरदार रंगली होती. कोणाच्या म्हणण्यानुसार हा देव-देवसकीचा प्रकार होता तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार अन्य काही पण शेवटी पोलिसांनी तो मृतदेह नसून बकऱ्याचा मृतदेह असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा विश्वास टाकला. मिळालेल्या माहितीनुसार बाजूला राहणाऱ्या एकाने आपला मेलेला बकरा त्या ठिकाणी पुरल्याचे समोर आले. मात्र याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी यंत्रणा दाखल झाली. खोदकाम सुरू असताना परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे संशय आणखी बळावला. प्रशासन आणखी सतर्क झाले. परंतु शेवटी त्या ठिकाणी बकरा असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सर्वांनी हसत-हसत त्या ठिकाणावरून माघारी फिरणे पसंत केले.