कणकवली | मयुर ठाकूर : तालुक्यातील हळवल गावात नूतन पोलिस पाटील पदी हळवल गावचे रहिवासी विक्रांत ठाकूर यांची नियुक्ती झाली म्हणून विक्रांत ठाकूर यांचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अविनाश राणे, प्रभारी पोलिस पाटील उदय सांवत यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी येथील ग्रामपंचायत सदस्य रोहित राणे, अनंत राणे, माजी सरपंच रवींद्र परब, प्रभाकर चव्हाण, आप्पा ठाकूर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.