3.2 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

जानवली येथे मोठा अपघात ; चालक जखमी 

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली तरंदळे फाटा येथील ओव्हर ब्रिजवर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक ( KA २० AC ०४५९ ) साधारणपणे दुभाजकाच्या कठड्याला धडकला. धडकल्यांनातर पलीकडच्या लेनवरून मूळ लेनवर साधारणपणे वीस फूट अंतरावर पलटी झाला. मात्र हा अपघात महामार्गांवरील इतर अपघातांपेक्षा काहीसा वेगळा होता. अपघात नेमका कसा झाला हे समजलेच नाही. कंटेनर धडकल्यानंतर कंटेनर चे काही पार्ट हे दुभाजकाच्या मधील भागातून सर्विस रस्त्यावर पडले तर काही पार्ट हे महामार्गावरच होते. सदर कंटेनर ची पाहणी केली असता कंटेनरमध्ये मच्छी असल्याचे दिसून आले.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस तसेच कणकवली पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले होते. कंटेनर चालकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून घटनास्थळी अपघाताचा पंचनामा सुरू आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!