मंत्री दीपक केसरकर यांचा सणसणीत टोला
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : जयंत पाटील हे माझ्यापेक्षा सीनियर आहेत, त्यामुळे आजपर्यंत मी त्यांचा मान राखत आलोय परंतु माझ्या मतदारसंघात येऊन आरोप करण्या आदी या मतदारसंघात माझी ताकद किती आहे ? ती पहावी. मी जेव्हा राष्ट्रवादी सोडली तेव्हा तुमची राष्ट्रवादी पूर्णपणे संपुष्टात आली, ते आदी जयंत पाटील यांनी पहावे. उगाच माझ्या मतदारसंघात येवून आरोप केला तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा थेट इशारा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिला.
दरम्यान अमोल कोल्हे यांनी माझ्या मतदारसंघात येऊन काम बघण्यापेक्षा तुम्ही तुमची काळजी करावी. नुसते सिनेमांमध्ये काम करणं सोप असत पण जनतेमध्ये जाऊन तळागाळात लोकांचे प्रश्न सोडवणे यात खूप फरक आहे असा टोलाही त्यांनी यावेळी कोल्हे यांना लागावा.