12.3 C
New York
Monday, November 4, 2024

Buy now

विद्यार्थ्यांनी सजगपणे करिअरचा मार्ग निवडावा – यशवंत शितोळे

कणकवली : “विद्यार्थ्यांनी आयुष्यात करिअरची निवड करताना अत्यंत सजग राहुन पद्धतशीरपणे करिअरच्या योग्य मार्गाची निवड करावी. आर्थिक क्षेत्रात गुंतवणूक करताना जशी आपण पद्धतशीर व अभ्यासपूर्वक गुंतवणूक करतो तसेच शिक्षण घेताना आपल्याला आवडेल तशा पद्धतीने करिअरची निवड करायला शिकले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी केले.

येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात करिअर कट्टा विभागाच्या वतीने विद्यार्थी संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले.

ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईल सारख्या तंत्र ज्ञानापासून सावध राहायला हवे. तंत्रज्ञान आपल्याला वापरते की; आपण तंत्रज्ञानाला वापरतो हे समजून घ्या. शिक्षण घेत असताना किमान एक तरी कौशल्य आत्मसात केलेच पाहिजे तरच आपण अधिक यशस्वी होऊ शकतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे होते. यावेळी करिअर कट्टा विभागाचे प्राचार्य समन्वयक डॉ. चंद्रकांत काकडे, करिअर कट्टा विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. अजित दिघे उपस्थित होते.

याप्रसंगी महाविद्यालयातील करिअर कट्टा नामफलकाचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयातील २२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थी संवाद उपक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नूतन घाडीगावकर यांनी केले. विद्यार्थी संवाद उपक्रमाची भूमिका करिअर कट्टा विभागाचे समन्वयक कॅप्टन डॉ. बी. एल. राठोड यांनी विशद केली व शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. अविनाश पोरे यांनी मांडले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!