20.4 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

व्यसनाधीनता युवाईला शाप ठरत आहे – ॲड.देवदत्त परुळेकर 

आचरा : सधनता वाढत असल्याने मुलांच्या हातात अल्पवयातच पैसा येत आहे.यामुळे पैसा चांगल्या ठिकाणी कसा खर्च करावा याबाबत अनभिज्ञ युवक व्यसनाधीनतेकडे वळत आहेत.याबाबत प्रत्येकाने सजगता बाळगून वाममार्गाला जाणारया युवा पिढीला सावरणे आवश्यक बनले आहे.

असे मत ॲड. देवदत्त परुळेकर यांनी आचरा येथे व्यक्त केले. वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रा.बि.सह.पतसंस्था मर्या. आचरा यांच्यातर्फे दिला जाणारा “कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार यावर्षी ॲड. देवदत्त परूळेकर”;वेंगुर्ला यांना जाहीर झाला होता.त्याचे वितरण संस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांच्या हस्ते सन्मानपत्र,सन्मानचिन्ह शाल,श्रीफळ आणि रोख रू.पाच हजार देवून केले गेले.यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांच्या सोबत श्रीमती वैशाली सांबारी, वैभवशाली पतसंस्थेचे व्हा चेअरमन सुरेश हडकर, राजन पांगे, लक्ष्मण आचरेकर, डॉ प्रमोद कोळंबकर, वामन आचरेकर, संतोष गावकर, पांडूरंग वायंगणकर , दिलिप कावले, कुबल,खोत, ढेकणे आदी उपस्थित होते.

यावेळी परुळेकर यांनी सार्वजनिक क्षेत्रात वावरताना माणसाचे चारीत्र्य स्वच्छ असले पाहिजे आर्थिकदृष्ट्या देखील माणूस चारीत्र्य संपन्न असावा तरच संस्था जोमाने वाढतात.यामुळेच आपण अध्यक्ष पद स्विकारल्यानंतर नाथपै चा ट्रस्ट बॅलन्स एक कोटी पेक्षा जास्त झाल्याचे सांगितले.तसेच आचरा येथे बॅ नाथ पै सेवांगणची शाखा सुरू करण्याचा मनोदय व्यक्त करुन पुरस्काराप्रती मिळालेली रक्कम येथील कार्यासाठीच खर्च करण्याचा मनोदय व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!