11.1 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

कणकवलीत सायकल रॅलीच्या माध्यमातून व्यसनमुक्ती जनजागृती

कणकवली : नशा मुक्त भारत अभियानाअंतर्गत कणकवली पोलीस ठाणे, नशाबंदी मंडळ शाखा सिंधुदुर्ग, समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्तपणे व्यसनमुक्ती सप्ताह निमित्ताने कणकवली शहरातून व्यसनमुक्ती जनजागृती करिता सायकल रॅलीचे 8 ऑक्टोंबरला सकाळी 7.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

या रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ युवक, युवती, महिला, तरुण, सर्व प्रशासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी होऊन व्यसनमुक्तीचा ड्रग स्मृतीचा संदेश द्यायचा आहे. आपण सर्वांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन व्यसनमुक्तीच्या प्रचार प्रसार प्रबोधनकार्यात सहकार्य करावे असे आवाहन कणकवली पोलीस स्टेशन आणि नशाबंदी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी नाव नोंदणी सहा तारखेपर्यंत या संपर्क नंबर वर ९४२०२६११९६, 918380804525 करावी. रॅलीत प्रत्येक सहभागी सदस्याला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी साडेसात वाजता आप्पा पटवर्धन चौकातून रॅलीला सुरुवात होईल. बाजारपेठेतून पटकी देवी नगरपंचायत मार्गे विद्या मंदिर हायस्कूल कडून तहसील कचेरी या मार्गावर होईल. आणि समारोप बस स्थानक शेजारी बुद्ध विहार प्रांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे होईल. या रॅलीचे संयोजन कणकवली सायकल रायडर ग्रुप यांनी केले आहे. सर्वांनी रॅलीत सहभागी होऊन व्यसनमुक्तीच्या कार्याला हातभार लावावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!