8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

सिद्धिविनायक गणपती मंदिर मुंबई न्यासाच्या सदस्यपदी मीना कांबळी

मसुरे : प्रभादेवी  मुंबई येथील श्री सिद्धिनायक गणपती मंदिर न्यासाच्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी मालवण तालुक्यातील रेवंडी गावच्या आणि शिवसेना पक्षाच्या महिला नेत्या मीना कांबळी यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मीना कांबळी यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी त्यांचे खास अभिनंदन केले आहे.

मीना कांबळी या मुंबई येथे शिवसेनेच्या महिला नेत्या म्हणून काम करत असून गेली अनेक वर्ष त्या सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.

यापूर्वी सुद्धा त्यांनी साई संस्थान शिर्डी या संस्थेच्या ट्रस्टी म्हणून काम केलेल आहे. अनेक संस्थांवरती त्या कार्यरत असून एक डॅशिंग महिला नेत्या म्हणून त्या सर्वांना परिचित आहेत. रेवंडी गावातही त्यांचे सामाजिक राजकीय कला क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्या या निवडीबद्दल रेवंडी गावातून तसेच मुंबई येथून अभिनंदन होत आहे. यावेळी बोलताना मीना कांबळी म्हणाल्यात सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या सदस्य पदी निवड झाली हे आजवरच्या माझ्या कार्याचा गौरव असून मिळालेल्या संधीचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी तसेच सिद्धिविनायक बाप्पाच्या भक्तांसाठी काम करणार असून सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाला अभिमान वाटेल असे कार्य माझ्या हातून घडेल.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!