कणकवली : गांधी घराण्याचे वारस, काँग्रेस ननेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी केलेल्या विधानानंतर त्याची दखल देशात घेणे गरजेचे आहे. काँग्रेसने कायमच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अन्याय केला आहे. पंतप्रधान मोदी आरक्षणाचे संरक्षण करायला समर्थ आहेत. आरक्षणविरोधी बोलणाऱ्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे जे नेते उद्या प्रचाराला येतील त्यांना राहुल गांधींच्या आरक्षण संपवण्याच्या विधाना जाब विचारावा असे आवाहन भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील आरक्षण बचाव रॅलीत केले. जय हिंद जय भीम नारा देत आमदार नितेश राणे यांनी आंबेडकरी जनतेची मने जिंकली.
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला माहिती असायला हवी की कोणत्या विचारला आपण मतदान करत आहोत. राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी विधान केले तेच जर पंतप्रधान मोदी यांच्याकडून झाले असते तर आज देशभरात गावागावात वाड्यावस्त्यांवर भाजपा आणि मोदींविरोधी रान उठवले असते. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा आरक्षण रद्द करणार आणि संविधान बदलणार अशा वावड्या उठवून बहुजन समाजाला फसवलं गेले. जर मोदींकडे 400 पार चे बहुमत असते तर देशाच्या प्रगतीसाठी दबावाशिवाय निर्णय घेता आले असते. आज 240 खासदार असलेल्या भाजपला विरोधकांच्या दबावाचा सामना करावा लागत आहे. भाजपा चे सरकार आल्यावर संविधान बदलणार ह्या फसव्या प्रचारावेळी मतदारांनी त्याचा पुरावा मागितला नाही.
मागासवर्गीय जनतेला आपण काहीही सांगितले तरी ते आपल्यावर विश्वास ठेवतात ह्यामुळे आज राहुल गांधी विदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात. आरक्षण बचाव रॅली तून घरी जाताना विचार करा की आरक्षणामुळे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य सभापती, नगरसेवक नगराध्यक्ष होण्याचा हक्क मागासवर्गीय जनतेला मिळाला आहे. जर काँग्रेसला आपण साथ दिली तर हे आरक्षण राहुल गांधी बंद करणार म्हणतात. जर राज्यात उद्या काँग्रेस विचारांचे सरकार आले तर आपल्या हक्काचे हे आरक्षण संपेल हे लक्षात घ्या. देशाला संविधान राज्य घटना देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने कायम पाण्यात पाहिले. कायम बाबासाहेबांवर काँग्रेसने अन्याय केला. याउलट पंतप्रधान मोदी यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीला आणि संविधानाला मोठे करण्याचे काम केले.
राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधात केलेले विधान आजवर नाकारले नाही. उद्या जेव्हा काँग्रेसवाले महाविकास आघाडीवाले प्रचाराला येतील तेव्हा त्यांना जनतेने विचारावे की आरक्षण रद्द करण्याचा राहुल गांधींच्या भूमिकेचे काय ? आरक्षण बचाव रॅली काढण्यामागे मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जनतेमध्ये राहुल गांधींच्या आरक्षणीविरोधी भूमिकेबद्दल जनजागृती व्हावी हा उद्देश आहे. आज बौद्ध, चर्मकार, ठाकर, धनगर ओबीसी, मराठा समाजाचे नेते या रॅलीत सहभागी झाले आहेत. आज उघडपणे आरक्षण विरोधी बोलणाऱ्या काँग्रेस ची सत्ता आली तर ते आरक्षण संपवल्याशिवर राहणार नाहीत असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.