शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजन; रविवारी मालवण बंदर जेटी येथे होणार शुभारंभ
इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे होणार व्याख्यान
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे तो पुतळा कोसळला. एकंदर महाराष्ट्राची अस्मिता खाली कोसळली. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असताना घटनाबाह्य शिंदे -फडणवीस सरकारने भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले. पुतळ्याची जबाबदारी नौदलावर टाकून जिल्ह्यातील सत्ताधारी नामानिराळे झाले. पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांव्यतिरिक्त अन्य कोणावरही कारवाई अथवा चौकशी करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा असा अपमान होऊन देखील शिंदे-फडणवीस सरकार खऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालून पुतळ्यात झालेला भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अशा भ्रष्टाचाऱ्यांना आता जनताच जागा दाखविणार आहे. छत्रपतींच्या अपमानाशी कदापि तडजोड होणार नाही आणि त्यासाठीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं. ५ वाजता मालवण बंदर येथे शिवसन्मान यात्रेचा शुभारंभ होणार आहे. यावेळी इतिहास अभ्यासक शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील हे उपस्थित राहणार असून त्यांचे व्याख्यान होणार आहे.
यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, उपनेते अरुण दुधवडकर,आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत,कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, कुडाळ विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभुगावकर,उपनेत्या तथा जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सदर शिवव्याख्यानास शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व युवतीसेनेच्या सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि जिल्ह्यातील शिवप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, मालवण शहर प्रमुख बाबी जोगी, युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महिला कुडाळ विधानसभा प्रमुख श्रेया परब, मालवण तालुका समन्वयक पूनम चव्हाण, युवतीसेना कुडाळ विधानसभा प्रमुख शिल्पा खोत यांनी केले आहे.