कणकवलीत सा. बां. विभागाच्या बाहेर लावण्यात आलेल्या वृत्तपत्रातील कात्रणाचा बॅनर ठरतोय चर्चेचा विषय
कणकवली | मयुर ठाकूर : काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागात टेंडर मॅनेज प्रकरणी राडा उबाठा सेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये हमरातुमरी झालेली पाहायला मिळाली होती. त्यानंतर जिल्ह्यातील राजकारणही तापले होते. त्यामध्ये प्रामुख्याने कणकवलीच्या सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप होऊ लागले होते. आज मात्र कणकवलीत राजकीय बॅनर ची चर्चा सुरू असताना आज मात्र कणकवलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेटवर एका वृत्तपत्रात छापून आलेल्या कात्रणाचा बॅनर करून लावण्यात आल्याने पुन्हा एकदा शांत झालेला बाऊन्सर चा विषय चर्चेत आला आहे. तसेच या हा बॅनर नेमका सार्वजनिक बांधकाम विभागाबाहेरच का लावण्यात आला आहे असा सवालही उपस्थित केला जात आहे.