युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा पलटवार
कणकवली : काल ओरोस येथे सार्वजनिक बांधकाम विभाग येथे टेंडर मॅनेज करण्यावरून शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावरून माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी विडिओ पोस्ट करून आमदार वैभव नाईक यांच्यावर टेंडर मॅनेज करण्यासाठी आमदार नाईक यांनी तो राडा केला असल्याची टिका केली होती. यावर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी निलेश राणेंना प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी सुशांत नाईक म्हणाले की, निलेश राणेंना टेंडर मॅनेज कसे करायचे हे माहिती नाहीय. त्यांनी आपला भाऊ आमदार नितेश राणे यांच्याकडून टेंडर मॅनेज कसे करायचे हे शिकले पाहिजे. टेंडर मॅनेज करून पैसे कसे खायचे आणि भ्रष्टाचार कसा करायचा हे नितेश राणेंशिवाय अन्य कोणाला माहिती नाहीय. निलेश राणे जरी डॉक्टरेट मिळवली असली तरी नितेश राणेंनी भ्रष्टाचारात पीएचडी केली आहे. कॉन्ट्रॅक्टर न कसे मॅनेज करायचं हे कणकवली – कुडाळ – देवगड मधील सर्व कॉन्ट्रॅक्टर ना विचारा नितेश राणे प्रत्येक टेंडर मॅनेज करण्यासाठी १०% शिवाय पैसे घेत नाहीत. त्यामुळे प्रत्येक टेंडर चे पैसे नितेश राणेंच्या किशात जातात. आणि तेही त्यांचे स्वीय साहाय्यक राकेश परब यांच्यामार्फत ते किशात घातले जातात. समाज कल्याणचे पैसे देखील यांच्या मार्फतच नितेश राणेंपर्यंत पोहोचले आहेत. पुढे पाठी अकाउंट डिटेल्स देखील आम्ही बाहेर काढणार आहोत. त्यामुळे कसा काय भ्रष्टाचार नितेश राणे करतात हे निलेश राणेंनी समजून घ्यावे, असे प्रत्युत्तर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिले आहे.