6.5 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

सिंधुदुर्गची केशर निर्गुण राष्ट्रीय कॅरम स्पर्धेची उपविजेती

कुडाळ, प्रतिनिधी : ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे ४७ वी कुमार गट राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान खेळविली गेली. या स्पर्धेमधे महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील मुलींमधे प्रथम क्रमांक मिळवून सिंधुदुर्गची कॅरमपटू केशर निर्गुण सहभागी झाली होती. उपउपान्त्य फेरीत केशरने संभाव्य विजेत्या इंडियन ऑईलच्या एम. खाजिमाला ३ सेट्स मधे हरवत खळबळ उडवून दिली. उपान्त्य फेरीत जैन इरिगेशनच्या श्रृती सोनावणेला नमवत तिने अंतिम फेरी गाठाली. अंतिम फेरीत मात्र जैन इरिगेशनच्या समृद्धी घाडीगावकरकडून तिला हार पत्करावी लागली.

२०२२ साली केशरने राष्ट्रीय स्पर्धेत १८ वर्षांखालील मुलींमधे तिसरा क्रमांक मिळवला होता. ग्वाल्हेर येथील या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या जुनिअर मुलांच्या संघाने सुवर्णपदक तर ज्युनिअर मुलीच्या संघाने कांस्य पदकाची कमाई केली.

२१ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अथर्व पाटीलने रौप्य पदक पटकाविले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!