23 C
New York
Wednesday, July 2, 2025

Buy now

कणकवली येथे आज राष्ट्रीय लोकअदालत

कणकवली : दिवाणी न्यायालय, कणकवली येथे शनिवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन करण्यात आलेले आहे. दिवाणीन्यायालयातील प्रलंबित दिवाणी व फौजदारी कडील प्रकरणे तसेच राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, स्वायत्त संस्था ग्रामपंचायत कडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत त्यांनी ती तालुका विधी सेवा समिती कणकवली कडे दाखल करावीत.

ज्यांना त्यांची प्रकरणे चर्चेद्वारे मिटवायची असतील त्यांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात उपस्थित राहावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश, कणकवली तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष टी.एच. शेख व सह दिवाणी न्यायाधीश कणकवली एम.बी. सोनटक्के यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!