पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
एकूण आठ अग्निशमन बुलेट ; पाणी साठविण्यासाठी ३५ लिटरची टाकी
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ नगरपालिका व नगरपंचायतीसाठी अग्निशमन दलामध्ये बुलेट ही मोटारसायकल दाखल झाली आहे. या नव्या अग्निशमन बुलेटचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले.
महाराष्ट्र अग्निशमन संचालयाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अग्निशमन दलामध्ये ८ अग्निशमनं बुलेट मोटारसायकल दाखल झाले आहेत. यांचा उपयोग ज्याठिकाणी अग्निशमन दलाचे मोठे वाहन जाऊ शकत नाही, त्याठिकाणी ही मोटारसायकल जाऊ शकते. यामध्ये पाणी साठवण्यासाठी ३५ लिटरची टाकी देण्यात आली आहे. तसेच २० मीटरचा पाईप देण्यात आला आहे. या मोटारसायकलला सायरनही आहे. या आठही मोटारसायकल्स प्रत्येक नगरपालिका व नगर पंचायतींना देण्यात येणार आहेत.
दरम्यान, जनता दरबाराच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आलेले पालकमंत्री यांच्या हस्ते अग्निशमन बुलेटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. तर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी उपस्थित होते.