8.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

नरडवे मार्ग दुभाजकाचे सुशोभिकरण कणकवलीच्या सौंदर्यात भर टाकणार

कणकवली | मयुर ठाकूर : शहरातील नरडवे मार्गावर रेल्वे स्टेशनपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकाचे सुशोभीकरण करण्याचं काम कणकवली नगरपंचायतीने हाती घेतले आहे. ‘नागरी स्थानिक संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी योजना’ या योजनेतून नरडवे रेल्वे स्टेशन मार्गावरील दुभाजकांवर शिल्पकृती उभारण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर लवकरच या कामाचे उद्घाटन देखील होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे कणकवली शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

कणकवली शहर हे पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे. नरडवे मार्गावरीलच सेल्फी पॉईंट, गणपती साना येथील धबधबा, विमानतळासारखे वाटणारे सुशोभित झालेले कणकवली रेल्वे स्टेशन, सुशोभीकरण केलेला क्रीडा संकुलाचा परिसर आणि आता नरवडे रेल्वे स्टेशन मार्गावर उभारण्यात येणाऱ्या शिल्पकृती कणकवलीच्या सौंदर्यात भर टाकणार आहेत.

या शिल्पकृतींमध्ये माझी वसुंधरा, विविध प्रकारची योगासने, सेव्ह द चाईल्ड, पृथ्वी वाचवा, डॉक्टर, स्वच्छतेचा संदेश अशा प्रकारची शिल्पे बसविण्यात येत आहेत. सदरच्या शिल्पांच्या माध्यमातून नागरिकांना विविध सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न नगरपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. अशा प्रकारची एक ना अनेक विकास कामे व सुशोभीकरण यामुळे कणकवली शहर हे पर्यटकांना आकर्षित करत आहे. या कामावर अंदाजे ५० लाख रूपयांचा निधी खर्च होणार असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!