11.3 C
New York
Friday, November 8, 2024

Buy now

वेंगुर्लेत ३० सप्टेंबरला ‘मुलांच्या मोबाईलचे करावयाचे काय‘ यावर मार्गदर्शन

वेंगुर्ला : ‘माझा वेंगुर्ला‘ व बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने ३० सप्टेंबरला दुपारी ३ वाजता कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात ‘मुलांच्या मोबाईलचे करावयाचे काय‘ या विषयावर सायबरच्या जर्नालिस्ट मुक्ता चैतन्य यांचे मोफत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सायबर पालकत्व का महत्त्वाचे आहे, का समजून घेतले पाहिजे? पालकांची जबाबदारी काय? काय करा-काय टाळा?, कोरोना महामारीने मुलांमध्ये नक्की काय बदल केले? सायबर क्राईममुळे मुलांना असलेले धोके, चांगला स्क्रिन टाईम म्हणजे काय? मुलांचा स्क्रिन टाईम कमी करणार कसा? याबाबतचे मार्गदर्शन केले जाणार आहे. हा कार्यक्रम मुलांबरोबरच आई-वडील व शिक्षक यांच्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!