15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किशोर कदम यांचा कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षण पुरस्कार ओसरगाव शाळा क्रमांक १ चे शिक्षक किशोर देवू कदम यांना प्राप्त झाला. आज कलमठ ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. किशोर कदम सर हे गावाच्या प्रत्येक सामाजिक कामात सहकार्य असते,उत्तम वक्ते, लेखक असून उपक्रमशील शिक्षक म्हणून कदम सर परिचित आहेत. यावर्षीचा सिंधुदूर्ग जिल्हापरिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. आज कलमठ ग्रामपंचायत मध्ये सरपंच संदिप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य प्रीती मेस्त्री, सचिन खोचरे, नितीन पवार,सुप्रिया मेस्त्री ,स्वाती नारकर, श्रेयस चिंदरकर,धीरज मेस्त्री, रवींद्र यादव,नजराणा शेख व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!