1.3 C
New York
Thursday, March 19, 2026

Buy now

सिंधुदुर्गात आज “ऑरेंज” तर उद्या “यलो अलर्ट”

कणकवली : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज “ऑरेंज” तर उद्या “यलो अलर्ट” जाहीर करण्यात आला आहे.

सिंधुदुर्गात आज मुसळधार ते अति मुसळधार पाउस पडण्याची शक्यता असून जिल्ह्यात सोसाट्याचा वारा वाहण्याची, तसेच ढगांचा गडगडाट होवून वीजा चमकण्याची शक्यता दर्शवली आहे. तर उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागाने वर्तविलेली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!