6 C
New York
Thursday, March 19, 2026

Buy now

….अन्यथा ग्रामस्थ आपल्या जमिनी ताब्यात घेतील

सासोली प्रकरणावरून संदेश पारकर आक्रमक

दोडामार्ग तहसिल कार्यालयावर मोर्चा

दोडामार्ग :  सासोली येथे झालेला जमीन गैर व्यवहार लक्षात घेता त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या अकृषीक सनदा तात्काळ रद्द करण्यात याव्यात. हा प्रकार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तात्काळ याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा संतप्त ग्रामस्थ आपल्या जमिनी ताब्यात घेतील.

यावेळी घडणाऱ्या परिणामाला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज येथे दिला. सासोली प्रकरणावरून श्री. पारकर यांनी आज येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी काही झाले तरी आम्ही स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असेल तर प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन तो दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा, अन्यथा आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, असा इशारा पारकर यांनी दिला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!