10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत भात पिकासाठी प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजना

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण भात पिकाखालील क्षेत्र साधारणतः ५६१६८ हे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणतः ३५०० mm पाऊस पडतो. या पावसामुळे काढणीच्या वेळेस साधारणतः १५ ते २० टक्के नुकसान होऊन उत्पन्नात घट होते व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे भात पिकाचे काढणीच्या वेळेत होणारे नुकसान टाळण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना सन २०२४-२५ अंतर्गत प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजनेकरिता ७५ टक्के अनुदान तत्वावर मंजुरी देण्यात आली आहे. तरी तालुक्यातील शेतक-यांनी आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन कणकवली तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे यांनी केले आहे.

सदर योजनेस पात्र शेतकऱ्याकडे ०.१० हे. क्षेत्र भात पिकाखालील असावे व एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल, अनुसुचीत जाती व अनु. जमाती, महिला तसेच अल्प व अत्यल्प शेतक-यांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा परिषद [कृषी विभाग] सिंधुदुर्ग यांची जिल्हा स्तरीय खरेदी समितीने निश्चित केलेला दर रु. २०००/- प्रति प्लास्टिक ताडपत्री आहे. त्यानुसार ७५ टक्के अनुदान प्रमाणे सदर प्लास्टिक ताडपत्री साठी जास्तीत जास्त रु. १५०० प्रति ताडपत्री अनुदान देय राहील. तसेच एका शेतकऱ्यांस जास्तीत जास्त १ ताडपत्री खरेदी करता येईल. सदर प्लास्टिक ताडपत्री ३३० gsm चे व आकारमान ६ मी x ४ मी इतके असावे. सर्व साहित्य BIS/ISI प्रमाणित असणे बंधनकारक असेल. तसेच सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत आंबा पिकासाठी प्लास्टिक क्रेट्स आणि प्लास्टिक ताडपत्री योजने अंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यास सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही सदर योजने करीता ७/१२, ८ अ, बँक पासबुक, आधार कार्ड व रेशन कार्ड इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.

तरी सदर योजने अंतर्गत जिल्ह्यातील अंदाजे ३१०० शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार असून सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता तालुका कृषी कार्यालय अथवा संबंधित क्षेत्रीय कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त शेतक- यांनी दि २७ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन भाग्यश्री नाईकनवरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग व तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!