8.5 C
New York
Monday, October 27, 2025

Buy now

वरवडे येथील युवक गौरव घाडीगांवकरचे मुंबईत आकस्मिक निधन

कणकवली : कणकवली तालुक्यातील वरवडे येथील गौरव घाडीगांवकर या युवकाचे रविवारी मुंबई आकस्मिक निधन झाले . शिक्षणानंतर मुंबई येथे नोकरीनिमित्त राहत असलेल्या गौरवचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झोपेतच निधन झाले.

अत्यंत मनमिळावू , हसतमुख आणि सर्वांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या गौरवच्या निधनाने परिसरात तसेच मित्र परिवारामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ऐन पंचवीशीमध्ये काळाने हिरावून नेलेल्या गौरवच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कणकवली बाजारपेठेतील सुनिता स्टील सेंटरचे मालक मिलिंद घाडीगांवकर यांचे ते सुपुत्र होत.तर बाजारपेठेतील व्यावसायिक भास्कर घाडीगांवकर यांचे ते नातू होत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!