10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

मालवणात जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन

मालवण : मालवण येथील नगर वाचन मंदिर तर्फे कवी शरद साटम स्मृति जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत १६ वर्षे व त्यावरील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे.

या स्पर्धेसाठी कविता स्वरचित व मराठी असावी. सामाजिक व प्रेम विषयक कविताना प्राधान्य देण्यात येईल. तसेच स्पर्धेकाने कविता स्वतः सादर करायची आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. ७००, रु. ५००, रु. ३०० व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या कविता १२ ऑक्टोबर पर्यंत संजय शिंदे, ग्रंथपाल- नगर वाचन मंदिर मालवण यांच्याकडे पाठवाव्यात. अधिक माहिती साठी ९४२२२३४९५० व श्रेया चव्हाण ८३९०६९४३३१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने उदयराव मोरे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!