कणकवली | मयुर ठाकूर : मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. तूर्तास तरी पावसाळा संपला असे वातावरण झाले होते. मात्र अलीकडेच दोन – तीन दिवसांपासून पाऊस दुपार सत्रात अगदी मुसळधार कोसळू लागला आहे. त्यामुळे शेतकरी राजा मात्र चिंतेत सापडला आहे.
काही दिवसांतच भात शेतीची कापणीचे काम सुरू होते. आणि नेमकं त्याच दिवसांत पावसाने मुसळधार कोसळण्यास सुरुवात केली असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. कुठेतरी हाता तोंडाशी आलेला घास पावसामुळे नुकसानीत सापडतो की काय अशा चिंतेत शेतकरी राजा आहे. दुपार सत्रात अगदी संततधार आणि काहीसा ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत असल्याने काहीसे भीतीदायक वातावरण देखील निर्माण झाले आहे.