सुधीर राऊळ यांचा आरोप ; लवकरच राज ठाकरे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्या ग्रामस्थांची भेट घालून देणार
सावंतवाडी : उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख यांचे एका कंपनी बरोबर साटेलोटे आहे. त्यामुळे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख यांनी आंदोलनातुन माघार घेतली आहे.त्या कंपनी उबठा गटाचे जिल्हाप्रमुख यांना घेऊन काही ग्रामस्थांना दमदाटी करतात. हे मनसे कधीही खपवून घेणार नाही. उबाठा गटाचे दोन्ही बाजुचे नेते लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत असा आरोप मनसेचे पदाधिकारी सुधीर राऊळ यांनी केला आहे.दरम्यान सासोली ग्रामस्थाच्या बाजुने मनसे राहणार ठाम पणे उभी राहणार असल्याचा देखील श्री राऊळ यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, थोड्याच दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत, त्या दौऱ्यात मनसे प्रदेश सरचिटणीस संदिप दळवी आणि कामगार सेना प्रदेश सरचिटणीस गजानन राणे यांच्या मार्गदर्शनात सासोली ग्रामस्थांची राज ठाकरेंशी भेट घालुन देणार, त्या नंतर मनसे ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार बरोबर आणि सासोलीतील पिडीत ग्रामस्थांना न्याय मिळवून देणार. या भुमाफियांची आणि त्यांना मदत करणाऱ्या पुढार्यांची पोलखोल करून आणि ग्रामस्थांनच्या मदतीने भुमाफियांना हद्दपार करणार असा इशारा श्री.राऊळ यांनी दिला..