2.9 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

११२ नंबरवर फोन करून मज्जा करणे दोघांना पडले भारी ; दोघांवर गुन्हा दाखल

कुडाळ : कुडाळ येथील महामार्ग जवळ एका मुलीवर अत्याचार सुरू असल्याचा कुडाळ पोलीस ठाण्याच्या ११२ या नंबरवर फोन आला आणि पोलिसांची धावपळ उडाली पण हा फोन पोलिसांची धावपळ उडवण्यासाठी केला असल्याचे निदर्शनास आल्यावर फोन करणाऱ्या विनम्र अवधूत मोरे (रा. देवगड) व नंदिता रामचंद्र मोरे (रा. रायगड) यांच्या विरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांना खोटा फोन करून त्यांची फसवणूक करणे या दोघांच्याही अंगलट आले आहे.

जास्तीत जास्त गुन्हे रोखण्यासाठी गृह मंत्रालयाने जलद प्रतिसाद प्रणाली आणली आहे यासाठी ११२ हा क्रमांक देण्यात आला आहे मात्र याचा गैरवापर सर्रास अलीकडे होऊ लागला आहे. गैरवापर करणाऱ्यांवर आता पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. कुडाळ शहरात अशाच प्रकारची घटना घडली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील एका हॉटेल जवळ विनम्र मोरे व नंदिता मोरे हे दोघे मुंबईला जाण्यासाठी उभे होते आपली लक्झरी येईपर्यंत काहीतरी मज्जा करू या उद्देशाने त्यांनी ११२ या क्रमांकावर कॉल केला आणि एका मुलीवर एक मुलगा जबरदस्ती करत आहे अशी खोटी माहिती दिली. आणि फोन बंद केला. ही माहिती समजतात कुडाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पडताळणी केली असता त्या ठिकाणी अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान ११२ वर ज्या मोबाईलद्वारे फोन केला होता. त्याची पडताळणी केली असता खोटी माहिती देणारे दोघेही त्याच ठिकाणी सापडून आले या दोघांनाही कुडाळ पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले आणि त्यांना विचारणा केली असता आम्ही मज्जा म्हणून फोन लावला पण ही मज्जा त्यांची सजा बनली पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसाला कुठे माहिती देऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या या दोघांना 112 नंबर वर कॉल करणे महागात पडले आहे

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!