4 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

मसूरेत शालेय विद्यार्थी गुणगौरव व वह्या वाटप कार्यक्रम!

श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्टचे आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे कावावाडी येथील श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट यांच्या वतीने पंचक्रोशितील शालेय विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि वह्यावाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इ.१० वी, इ.१२ वी, पदवी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या ६०% वरील विद्यार्थांचा गुणगौरव व इतर विद्यार्थांना वह्यावाटप कावावाडी येथील पेडणेकर बंधू निवास येथे झाले. प्राथमिक विद्यालय मसुरे डांगमोडे ७ विद्यार्थी ,जिल्हा परिषद पू.प्रा.शाळा वेरली २५ विद्यार्थी, जि.प.शाळा मागवणे ४ विद्यार्थी, भरतगड इंग्लिश मिडीयम एस.एस.सी., आर.पी.बागवे हायस्कूल आणि मसुरे कावावाडी जि.परिषद शाळा १७ विद्यार्थि उपस्थित होते.आर.पी.बागवे हायस्कूल एस.एस.सी. यशवंत कु.वैष्णवी दत्ताराम सावंत -८९%, कु.पियुष संजय बागवे – ८८.४०%, कु.चेतन अनिल दुखंडे – ७७.४०%. भरतगड इंग्लिश मिडीयम एस.एस.सी. कु.बाबुराव समिर परब – ९०%, कु.वरद सतिश वाळके – ८६.४०%, कु.अच्युत अजय प्रभूगांवकर -८५%. यांचा तसेच कावावाडी मसुरे येथील कु.राज संजय हिंदळेकर – बी.एस.सी.केमिस्ट्री, कु.अमेय राजन पेडणेकर- ९३%, कु.मिताली दिपक मसुरकर- ७७%, कु.आयुष राजन करंजेकर – ७०%, कु.ऐश्वर्य मंगेश पेडणेकर- ७८%, कु.संस्कृती प्रशांत गोलतकर – ६२%, कु.मनिष रामदास गिरकर (एच.एस.सी.) – ६२%यांचा सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमास श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष श्री शरद रावजी पेडणेकर, खजिनदार श्री राजाराम दिनकर खोत, श्री दिनू पेडणेकर,श्री परमानंद पेडणेकर, श्री समिर पेडणेकर, श्री साईप्रसाद पेडणेकर,श्री काशिनाथ पेडणेकर,श्री चंद्रकात पेडणेकर, श्री बबन पेडणेकर, श्री रमण पेडणेकर, कु.निखिल पेडणेकर, कु.पियुष पेडणेकर ,कु.सिद्धेश पेडणेकर, मधुरा पेडणेकर, सौ.प्रियंका पेडणेकर, सौ.पल्लवी पेडणेकर, कु.दर्शित पेडणेकर, सुजाता पेडणेकर, सौ.सायली पेडणेकर, सौ.अनूजा पेडणेकर, श्री दिपक हिंदळेकर, श्री दिगंबर गोलतकर, श्री गिरकर,कु.किरण पेडणेकर, कु.निधी पेडणेकर, सौ.मनस्वी येसाजी,श्री अरूण आंबेरकर, श्री दिपक कातवणकर ,श्री संजय मसुरकर तसेच कावावाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!