3 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

पुस्तकाने मला काय दिले स्पर्धेत स्वरा पेंडूरकर, पलक महाभोज प्रथम ! बॅ नाथ पै सेवांगण कट्टाचे आयोजन    

मसुरे | झुंजार पेडणेकर : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा आयोजित कै. भाऊ गुराम पुण्यतिथी निमित्त पुस्तकाने मला काय दिले? या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत १०० विद्यार्थी सहभागी झाले होते.१०० विद्यार्थ्याना अंधश्रद्धा निर्मूलन व साने गुरुजी यांच्या जीवनावरील पुस्तके वाचनासाठी दिली होती. त्या पुस्तकात मला काय गवसले ? हे मुलानी २०० शब्दात लिहून स्पर्धेत भाग घेतला.या स्पर्धेत मोठ्या गटात कुमारी स्वरा अर्जून पेंडूरकर – खरारे हिने प्रथम क्रमांक व लहान गटात पलक पराग महाभोज- गुरामवाडी हिने प्रथम क्रमांक पटकावला मोठा गट द्वितीय क्रमांक साई राज शंभू परुळेकर वराड,मधूर अर्जून पेंडूरकर खरारे,तृतीय क्रमांक त्रिशा देवदास रेवडेकर कट्टा,उत्तेजनार्थ यशिका देवू पालव वराड,जान्हवी संतोष नांदो सकर नांदोस,गिरीजा राजेंद्र नाईक कुणकवळे.

लहान गट द्वितीय सोहम सूर्यकांत गावडे कट्टा, तृतीय . काव्य विनोद दळवी ओरोस,वैष्णवी संदीप गोळवणकर गोळवण. उतेजनार्थ प्रणित सूर्यकांत शिंदे वराड,वृषभ दतात्रय टेमकर वराड,गायत्री गणेश साळुंके पेंडूर,राशी सत्यवान चव्हाण चौके,धनश्री आनंद बाक्रे वराड,ईश्वरी उत्तम पाताडे कट्टा,वेदिका प्रमोद तेंडोलकर कट्टा,पायल फुलाराम देवासी कट्टा.

या स्पर्धेतील विजेते व सर्व सहभागी विद्यार्थी याना २७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता कै भाऊ गुराम यांचे स्मृतिदिनी सौ देवयानी गावडे मुख्या. वराडकर हायस्कूल कट्टा व सौ प्रिया मयेकर मुख्या. वराड हायस्कूल यांच्या प्रमुख उपस्थितीत भेटवस्तू व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन संयोजक दिलीप रामचंद्र गुराम बापू तळावडेकर, वैष्णवी लाड, शाम पावसकर यानी सेवांगणच्या वतीने केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!