मसुरे | झुंजार पेडणेकर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण, (ITI) येथे संविधान मंदिराचे उदघाटन मालवण आयटीआयचे प्राचार्य सचिन संखे व मालवण तंत्रनिकेतन प्राचार्य पी. एस. शिरहदी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सामाजिक न्यायाची खरी शिकवण हि भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्याने कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीना खरी सामाजिक न्यायाची शिकवण मिळावी यासाठी कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील 434 शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (III) मध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. संविधान मंदिराचे उदघाटन उपराष्ट्रपती जगदिप धनखड़ यांच्या हस्ते 15 सप्टेंबर 2024 रोजी 11.00 वाजता एलफिन्स्टन विद्यालय मुंबई येथून आभासी पदधतीने झाले.
संविधान मंदिरा बाबत जागरूकता आणण्यासाठी दि. 12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2024 दरम्यान प्राचार्य सचिन संखे यांच्या निरीक्षणा खाली औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण, (ITI) जि. सिंधुदुर्ग येथे संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत निबंध स्पर्धा, रांगोळी सार्धा, वक्तृत्व स्पर्धा व ईतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.जेणेकरून घटनात्मक अधिकार व कर्तव्या बहल जागरूकता संविधानाच्या दुरुस्त्या, कायदेशीर कलम, राज्यघटनेचे आकलन प्रशिक्षणार्थीनच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने केला गेला.
मालवण येथील उदघाटन कार्यक्रमास प्रमुख अतिथी प्राचार्य पी. एस. शिरहट्टी संस्थेतील कर्मचारी, आजी माजी प्रशिक्षणार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते, संविधान प्रेमी उपस्थित होते.