3.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

गावराईमध्ये भाजपला धक्का…

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील गावराई येथील असंख्य भाजप व राणे समर्थक कार्यकर्ते यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकास कामे मार्गी लावली आहेत. तसेच पुढील येणाऱ्या काळात राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन आमदार नाईक हे पालकमंत्री असतील व विकास कामे अजून जोमाने होतील असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाजप कार्यकर्ते मंगेश फाले व बाळा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज हा पक्षप्रवेश झाला.

या प्रवेशादरम्यान रमेश दादू फाले,नंदू नाऊ खरात ,विठ्ठल जनार्दन काळे ,गणेश राया फाले ,धाकू रामा फाले,अनंत सीताराम काळे, प्रकाश देवू फाले, चांगु बाबुराव फाले,सखाराम भगवान फाले, सुनील जनार्दन फाले, सतीश नाऊ फाले, बाबी धाकू जंगले, लक्ष्मण भगवान कोकरे, लक्ष्मण सखाराम फाले, अजित धाकू जंगले, संदीप सीताराम काळे, अनिकेत रमेश फाले, अमर रामा फाले, दिनेश धाकू फाले, सचिन सीताराम फाले, निलेश मंगेश फाले, दीपक विठ्ठल खरात, सुजल संतोष खरात, रोहित मंगेश कोकरे, संजय सखाराम काळे, रमेश चोंदू फाले, भगवान धोंडू फाले, संतोष केदू फाले, जाणू रामा फाले, महेश भगवान फाले, बालकृष्ण भगवान फाले, गोविंद भगवान फाले, संतोष मुरारी काळे, संतोष बाबी जंगले, ठकू जाणू फाले, संतोष नाऊ फाले, लक्ष्मण बाबू काळे, संतोष नाऊ खरात, शतांष खरात यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, विभाग प्रमुख नागेश ओरोसकर, अवधूत मालंडकर, छोटू पारकर, उपसरपंच संतोष सामंत, महेश परुळेकर, प्रकाश वालावलकर,कृष्णा गावडे, रमेश वाळेकर हरी वायंगणकर, सरिता जंगले, सानिका सामंत आदि शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!